B: Belief

Belief is the fuel which helps one achieve the goals. The only recipe for success is to believe that you can do it, to believe that you deserve it and to believe that you will get it. Belief is the ultimate motivation you can have- the motivation which will help you accomplish your goals.

One has to have a strong sense of self-belief in order to succeed. You need to create the certainty inside you, instead of finding it in the external world. It is necessary to trust one’s ability and intentions to make things happen. If you have self-belief, even talent or resources become secondary. Self-belief pumps up the optimism and helps you go ahead towards achieving your cause.

It is equally important to have a firm belief in the cause, the aim you are pursuing. This belief makes the journey towards the goal enjoyable and memorable. It uplifts your spirit and adds satisfaction to the process. Belief in cause is must in order to face the tough situations.

We have been conditioned to doubt ourselves, to inhibit ourselves. We therefore need to work on our belief system in order to get rid of our fears and inhibitions. Only then we can truly believe and open endless possibilities. Everything we have and everything we can have is the outcome of how much we believe in ourselves. The key is to believe in yourself, and be yourself!!

विश्वास

आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी उर्जा म्हणजे विश्वास. आपण यश मिळवू शकतो हा विश्वास, आपण यशासाठी पात्र आहे हा विश्वास, आणि ठरवलेले मिळवणारच हा विश्वासच यशाकडे घेऊन जाणारा राजमार्ग आहे. विश्वास ही आपले साध्य मिळवण्यासाठी आवश्यक असणारी शाश्वत प्रेरणा आहे.

दृढ आत्मविश्वास यशासाठी अत्यावश्यक ठरतो. बाहेरील जगातून स्थिरता व निश्चितता मिळवण्याची अपेक्षा करण्याऐवजी आपल्या अंतरंगातच हि स्थिरता व निश्चितता निर्माण करावी लागते. साध्य गोष्टी घडवून आणावयाच्या असतील तर स्वतःच्या क्षमता व उद्देश यांवर भरवसा असला पाहिजे. असा आत्मविश्वास असेल तर उपजत प्रतिभा व साधने कमी जास्त असणे सुद्धा दुय्यम ठरते. आत्मविश्वासातूनच आशावाद जन्माला येतो आणि हा आशावादच उद्दिष्टाकडे आपल्याला घेऊन जातो.

स्वतःशिवाय आपल्या उद्दिष्टावर, आपल्या साध्यावर सुद्धा दृढ विश्वास असला पाहिजे. हा विश्वास आपल्या ध्येयाप्रतीच्या प्रवासाला आनंददायी व स्मरणीय बनवतो. यामुळे एक नवे चैतन्य निर्माण होते आणि एक वेगळेच समाधान प्राप्त होते. अवघड प्रसंगांना सामोरे जायची शक्ती या उद्दिष्टावरील विश्वासातूनच मिळते.

स्वतःवर अविश्वास असणे, स्वतःला व्यक्त न होऊ देणे हे कुठेतरी आपल्या अंगवळणी पडले असते. त्यामुळे आपल्या विश्वासाच्या यंत्रणेवर काम करणे आणि या अविश्वासाला व कोंडमाऱ्याला उखडून फेकणे गरजेचे आहे. हे केले तरच विश्वासाद्वारे अमर्याद संभावना खुल्या होऊ शकतात. आपण जे मिळवले आहे आणि आपण जे मिळवू शकतो ते आपला स्वतःवर किती विश्वास आहे याचे द्योतक आहे. आणि यासाठी आवश्यक आहे ते स्वतः वर विश्वास ठेवणे, व स्वतःचे व्यक्तित्व जपणे!!

3 thoughts on “B: Belief

Add yours

  1. Khup chhaan sir , many thoughts in a small space
    belief is the base of any relationship and one can progress only with a strong belief , but can you explore spiritual and ethical angle of this? I think firm belief in a wrong goal can also create monsters like Hitler and can lead to extremism

    Like

Leave a comment

Blog at WordPress.com.

Up ↑