12 Rules for Life: An Antidote to Chaos (रँडम हाउस कॅनडा, पेंग्विन ऍलन लेन) हे कॅनेडियन मानसशास्त्रज्ञ जॉर्डन पीटरसन यांचे 2018 चे Self-help विषयक पुस्तक आहे. हे पुस्तक अमूर्त नैतिक तत्त्वे, मानसशास्त्र, पौराणिक कथा, धर्म आणि वैयक्तिक उपाख्यानातील दाखले वापरून त्याद्वारे मार्गदर्शन करते.
या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना अशी आहे की “दु:ख हे अस्तित्वाच्या संरचनेत बांधले गेले आहे” आणि जरी ते असह्य असले तरी, आपल्याकडे एकतर माघार घेणे किंवा त्यास सामोरे जाऊन त्यास पार करणे असे पर्याय आहेत. आयुष्य जगण्यासाठीचा एक वेगळा मार्ग या पुस्तकात लेखकाने सांगितला आहे.
ठळक मुद्दे:
- धैर्याने उभे रहा
जग एक कठीण, निर्दयी व्यवस्था आहे. तुम्ही त्याचा मजबूतपणे आणि धैर्याने सामना केला पाहिजे. आव्हानांपासून मागे हटू नका. तुमची ताकद ठळकपणे दिसू द्या आणि त्या आव्हानांना जाऊन भिडा.
- स्वत:ची आपुलकीने काळजी घ्या
जसे आपल्या आजारी नातेवाईकांची काळजी घेताना आपण आपुलकीने त्यांना सर्व सुविधा सुनिश्चित करतो, तसे स्वतःशी आपण का वागत नाही? तुम्ही दुसऱ्यावर प्रेम कराल तसे स्वतःवर प्रेम करा. आत्म-जागरूकता आणि आत्म-प्रेम ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
- जे तुमच्यासाठी सर्वोत्तम इच्छितात त्यांच्याशी मैत्री करा
तुमचे जवळचे वर्तुळ तुमच्याबद्दल बरेच काही सांगते. तुम्हाला असे मित्र हवे आहेत जे तुम्हाला तुमच्या क्षमतेच्या दिशेने पुढे ढकलतात. पण बर्याचदा, आपण अशा लोकांशी संबंध ठेवतो जे आपल्याला खाली खेचतात आणि मागे ठेवतात. तुम्ही ज्या 5 लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवता त्यांची तुम्ही सरासरी आहात असे मानून ही ‘सरासरी’ वाढवण्याचा प्रयत्न करा. सर्व बाबतीत आपली निवड सुयोग्य ठेवा.
- तुम्ही काल कोण होता त्याच्याशी स्वतःची तुलना करा
स्वतःशी स्पर्धा करा. स्वतःची इतरांशी तुलना करू नका. तुलनेमुळे तुम्ही पुढे असाल तर तुमचा अहंकार वाढेल आणि तुम्ही मागे असाल तर तुम्हाला वाईट वाटेल. त्याऐवजी, तुम्ही काल होता त्यापेक्षा आज थोडे चांगले बनण्याचा प्रयत्न करा.
- तुमच्या मुलांना असे काहीही करू देऊ नका ज्यामुळे ते नावडते बनतील (विचार स्पष्टपणे व्यक्त करा)
लोकांना (विशेषतः तुमच्या मुलांना) विनम्रपणे पण प्रभावीपणे कळू द्या, तुम्हाला काय वाटते किंवा अपेक्षा आहे. नंतर अपेक्षाभंग होऊन विसंवाद होण्यापेक्षा तुम्हाला प्रामाणिकपणे कसे वाटते ते कोणत्याही मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला सांगा. वाट न करून दिलेल्या तणावामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम निर्माण होतात. तुमच्या समस्यांना तोंड द्या आणि त्यांना लपवू नका.
- तुम्ही जगावर टीका करण्यापूर्वी आत्मपरीक्षण व सुधारणा करा
सेलिब्रिटी किंवा सार्वजनिक जीवनातील व्यक्तींवर त्यांच्या चुकांसाठी टीका करणे सोपे आहे. पण त्याआधी आरशात पहा. जगाने तुमच्या सर्व उणीवा पाहिल्या तर तुम्हाला काय वाटेल याची कल्पना करा. स्वतःला व्यवस्थित करा, मग जगावर टीका करा. हे आत्म-सुधारणेचे पहिले पाऊल आहे.
- अर्थपूर्ण (फायदेशीर नव्हे) काय आहे याचा पाठपुरावा करा
विचारपूर्वक आपले ध्येय निश्चित करा. 5, 10 किंवा 20 वर्षांनंतरच्या स्वतःची कल्पना करा. तुमच्या भावी व्यक्तिमत्त्वाला स्वतःचा अभिमान वाटेल अशा पद्धतीने वागा. अल्पावधीत जे सोपे आहे ते निवडल्याने दीर्घकाळाचे नुकसान होऊ शकते. कठीण निवडी = सोपे जीवन व सोपे पर्याय = कठीण जीवन हे समीकरण विसरू नका.
- सत्य सांगा- किमान खोटे बोलू नका
आपल्या शब्दांमध्ये निर्दोष रहा. जेव्हा तुम्ही खोटे बोलता तेव्हा तुम्हाला दोन परिस्थितींची काळजी करावी लागते- एक जेथे असत्य पुढच्या व्यक्तीसाठी सत्य आहे. आणि दुसरे जिथे तुम्हाला सत्य माहित आहे. याने भविष्यासाठी अडचणी तयार होतात आणि कायम भेडसावणारी चिंता निर्माण करते.
- समोरील व्यक्तीला तुम्हाला माहित नसलेली एखादी तरी गोष्ट माहित असू शकते, हे ध्यानात ठेवा
या जगात कोणीही सर्वज्ञ नाही. तुमचे तोंड बंद असतानाच तुम्ही काहीतरी शिकू शकता. प्रत्येक संभाषणात काहीतरी शिकण्याचे ध्येय ठेवा. हे तुम्हाला एक चांगला श्रोता बनवेल आणि तुम्हाला लोकप्रिय बनवेल.
- तुमच्या बोलण्यात अचूक रहा
मितभाषी व्हा. स्वतःबद्दल अशा गोष्टी बोलू नका ज्यामुळे तुम्हालाच अडचण होईल. नकारात्मक गोष्टी बोलू नका: मी आळशी आहे, मी ते करू शकत नाही, मी हुशार नाही यासारखी विधाने तुमची क्षमता मर्यादित करतात. वाढीची मानसिकता अंगीकारा आणि तुम्हाला घडू इच्छित असलेल्या गोष्टींच्या विषयी बोलायला लागा.
- मुलांचे बालपण हिरावू नका
जेव्हा तुम्ही मुलांना छोट्या चुका करताना किंवा बालीशपणा करताना पाहता तेव्हा त्यांना त्या पद्धतीने असू द्या. जर ते कोणाचे नुकसान करत नसतील तर त्यात काहीही वावगे नाही, ती त्या वयातील नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अशा प्रकारे ते जगाची ओळख करून घेतात आणि वाढतात. कदाचित तुम्ही ते बालिश कुतूहल तुमच्या स्वतःच्या आयुष्यात पुन्हा आणून बघू शकता.
- छोट्या गोष्टींचा आनंद घ्या
24/7 दयनीय अवस्थेत राहण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे. आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींचे कौतुक करा: तुम्हाला फिरताना दिसणारे गोंडस पाळीव प्राणी, पहिल्या पावसाचा सुगंध सकाळचा चहा-कॉफीचा पहिला घोट, थंडीच्या दिवशी मिळालेली उब- आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा.
संदर्भ: Twitter @jackmoses0
Wikipedia
Very nice rules of life. Must be followed by everyone for successful, happy and satisfied life.
LikeLiked by 1 person
Nice selection of book n very well summarised!
LikeLike