2025 साठी 25 संकल्पना

25 Ideas for 2025 ही या नववर्षाच्या आरंभी केलेली post अनेकांना आवडली. 22500 पेक्षा जास्त वाचकांपर्यंत ही post पोहोचली आहे. त्यानंतर अनेकांनी या post ला मराठीत पण टाकावे असे सुचवले होते. त्यानुसार ही post मराठीत भाषांतरित करून टाकत आहे. वर्ष 2025 सुरु होऊन दोन महिन्यांहून जास्त काळ निघूनही गेला आहे. अशाच गतीने हे जग पुढे... Continue Reading →

इकीगाई

‘इकीगाई’ म्हणजे असण्याचे कारण,जीवनाचा उद्देश. हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलेस यांनी ‘इकीगाई’ या जगद्विख्यात पुस्तकाद्वारे जपान मधील इकीगाई हे तत्त्वज्ञान जगासमोर आणले. स्वतःच्या जीवनाचा उद्देश शोधणे आणि त्याला साध्य करण्यासाठी पूर्ण समर्पणाने प्रयत्न करून एक आनंदी व समाधानी आयुष्य कसे जगावे याचा परिपाठ या पुस्तकात लेखकांनी आखून दिला आहे. एक अर्थपूर्ण, सुदृढ, सक्रीय आयुष्य व्यतीत... Continue Reading →

परिणामकारक अभ्यास

शैक्षणिक किंवा व्यावसायिक/कार्यालयीन आयुष्यात वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. अभ्यास हा दोन प्रकारचा असतो - संरचित अर्थात योग्यरित्या संरचना असलेला अभ्यासक्रम किंवा असंरचित म्हणजे एखाद्या विषयाबद्दल आवश्यक तेवढी माहिती जाणून घेणे. दोन्ही प्रकारांमध्ये आपण व्यतित केलेल्या वेळेपेक्षा अभ्यासाच्या परिणामकारकतेवर लक्ष केंद्रित करणे जास्त महत्त्वाचे आहे. पुढील मुद्दे अभ्यासाची उत्पादकता सुधारण्यास मदत करतील. तुमची मनोवस्था... Continue Reading →

Deep Work: पुस्तक परिचय

Deep Work (Grand Central Publishing) मध्ये लेखक कॅल न्यूपोर्टने आजच्या जगातील विचारसरणीच्या विपरीत कल्पना मांडली आहे. विचलित होणे वाईट आहे असा युक्तिवाद करण्याऐवजी, त्याच्या विरुद्ध ‘गहन कार्यशैली’ या संकल्पनेला या पुस्तकात प्रकाशझोतात आणले आहे. सांस्कृतिक टिप्पणी आणि कृती करण्यायोग्य सल्ला यांच्या माध्यमातून Deep Work वाचकांना संस्मरणीय किस्से आणि अर्थपूर्ण उपदेश यांच्या गावी घेऊन जाते. या... Continue Reading →

Limitless: पुस्तक परिचय

Limitless (Hay House Inc.) या विश्वविख्यात पुस्तकात लेखक जिम क्विक स्वतःच्या आयुष्यातून मिळालेले धडे सादर करतात. डोक्याला मार लागल्यामुळे मेंदूला दुखापत झाल्यानंतर लेखकाने संज्ञानात्मक मर्यादा झुगारून स्वतःला पुन्हा शिकण्यास कसे प्रशिक्षित केले याची कथा या पुस्तकात आहे. क्विकच्या मानसिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी एक साधे सत्य आहे: आपण सर्वजण आपल्या मेंदूला पाहिजे त्या दिशेला घडवू  शकतो आणि... Continue Reading →

12 Rules for Life: पुस्तक परिचय

12 Rules for Life: An Antidote to Chaos (रँडम हाउस कॅनडा, पेंग्विन ऍलन लेन) हे कॅनेडियन मानसशास्त्रज्ञ जॉर्डन पीटरसन यांचे 2018 चे Self-help विषयक पुस्तक आहे. हे पुस्तक अमूर्त नैतिक तत्त्वे, मानसशास्त्र, पौराणिक कथा, धर्म आणि वैयक्तिक उपाख्यानातील दाखले वापरून त्याद्वारे मार्गदर्शन करते. या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना अशी आहे की "दु:ख हे अस्तित्वाच्या संरचनेत बांधले... Continue Reading →

The 7 Habits of Highly Effective People: पुस्तक परिचय

स्टीव्हन कोवे यांचे The 7 Habits of Highly Effective People (फ्री प्रेस) हे प्रसिद्ध पुस्तक वैयक्तिक आणि व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी सर्वांगीण, एकात्मिक, तत्त्व-केंद्रित दृष्टिकोन सादर करते. कोवे या पुस्तकात निष्पक्षता, सचोटी, सेवा आणि मानवी प्रतिष्ठा या तत्त्वांसह जगण्याचा एक सूत्रबद्ध मार्ग प्रस्तुत करतात. ही तत्त्वे आपल्याला बदलाशी जुळवून घेतानाची सुरक्षितता आणि बदलामुळे निर्माण होणाऱ्या संधींचा... Continue Reading →

Atomic Habits: पुस्तक परिचय

जेम्स क्लियर द्वारा लिखित Atomic Habits (पेंग्विन बुक्स)  हे चांगल्या सवयी कशा अंगिकारायच्या, वाईट सवयी कशा सोडायच्या आणि दररोज 1% सुधारणा कशी साध्य करायची यावरील व्यापक आणि व्यावहारिक मार्गदर्शक आहे. तुमची उद्दिष्टे कुठल्याही प्रकारची असली तरीही, Atomic Habits तुम्हाला सुधारण्यासाठी एक शास्त्रसिद्ध मार्ग दाखवते. जगातील आघाडीच्या वर्तणूक विषयक मानसशास्त्र  तज्ञांपैकी एक असलेले जेम्स क्लियर या... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑