शैक्षणिक किंवा व्यावसायिक/कार्यालयीन आयुष्यात वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. अभ्यास हा दोन प्रकारचा असतो – संरचित अर्थात योग्यरित्या संरचना असलेला अभ्यासक्रम किंवा असंरचित म्हणजे एखाद्या विषयाबद्दल आवश्यक तेवढी माहिती जाणून घेणे. दोन्ही प्रकारांमध्ये आपण व्यतित केलेल्या वेळेपेक्षा अभ्यासाच्या परिणामकारकतेवर लक्ष केंद्रित करणे जास्त महत्त्वाचे आहे. पुढील मुद्दे अभ्यासाची उत्पादकता सुधारण्यास मदत करतील.

- तुमची मनोवस्था जाणून घ्या
मनोवस्था अर्थात मूड हा अतिशय महत्त्वाचा, पण अतिशय दुर्लक्षित विषय आहे. जेव्हा तुम्ही एखादा विषय किंवा एखादी माहिती जाणून घेण्यासाठी सकारात्मक मनोवस्थेत असता तेव्हा शिकणे नक्कीच सोपे असते. जेव्हा तुम्ही अभ्यास सुरू करता तेव्हा तुम्हाला तुमचा मूड सुधारावा लागतो. यासाठी तुम्हाला ठरवून प्रयत्न करावा लागतो. ध्यान, दीर्घ श्वासोच्छ्वास, भोवतालचे चांगले वातावरण या बाबतीत मदतीचे ठरते. तुम्हाला पर्याय व वेळ उपलब्ध असल्यास तुम्ही मूडनुसार वेगवेगळे विषय अभ्यासासाठी निवडू शकता. पण मनस्थितीचा विचार आणि मनमौजीपणा यात फरक करणे आवश्यक आहे. कुठेही शिस्त हरवता कामा नये.
- योग्य नियोजन करा
तुम्ही कशाचा अभ्यास कराल ते आधीच निश्चित करा. 4 तासांचा कालावधी पुढे ठेऊन त्यासाठी उद्दिष्ट ठरवा. आपल्याला आवश्यक असलेली सर्व संसाधने तयार ठेवा आणि आवश्यकतेनुसार हाताशी ठेवा. अनपेक्षित विलंब होण्याची शक्यता गृहीत धरा व ती भरपाई करण्यासाठी काही प्रमाणात लवचिकता ठेवा.
- विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा
तुमचा फोन, एखादे पुस्तक किंवा एखादी व्यक्ती जर तुम्हाला विचलित करत असेल त्यांना लपवा किंवा त्यांच्यापासून दूर राहा. एकाग्रतेशिवाय घालवलेल्या संपूर्ण दिवसापेक्षा 2-3 तासांचे अविचलित अभ्यासाचे सत्र जास्त लाभदायक आहे.
- अभ्यासाचे ठिकाण, परिसर व्यवस्थित ठेवा
जेव्हा शक्य असेल तेव्हा अभ्यासाचे ठिकाण परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्याचा प्रयत्न करा. नीटनेटक्या वातावरणात एकाग्रता सुधारते. तुम्हाला आवश्यक असलेली संसाधने उपलब्ध ठेवा आणि त्यांची पद्धतशीर व्यवस्था करा. किरकोळ गोष्टींसाठी तुम्हाला विचलित होण्याची गरज नाही याची खात्री करा.
- तुमची उर्जेचे व्यवस्थापन करा
पोषणाचा अभाव इच्छाशक्ती, मनःस्थिती आणि स्पष्ट विचार यासाठी हानिकारक आहे. ज्या काळात तुम्हाला सखोल अभ्यास करावा लागतो त्या काळात चांगला, सकस आहार घ्या. शरीरातील पाण्याची मात्रा योग्य प्रमाणात ठेवा कारण पाण्याच्या सेवनाने एकाग्रता सुधारते.
- आकस्मिक परिस्थितींसाठी योजना
आपण केलेल्या नियोजनानुसारच गोष्टी होतील हे जरूर नाही. तुमच्या वेळापत्रकात थोडा वेळ बफर म्हणून ठेवा. जर एखादा अभ्यासाचा मुद्दा वगळण्याची गरज असेल तर त्वरीत पुढे जाण्याचा प्रयत्न करा. एखादा विषय/ मुद्दा अभ्यासण्यासाठी आवश्यक साधनसामग्री नसेल तर पुढचा विषय/मुद्दा तयार ठेवा.
- स्वतः ला प्रोत्साहीत करा
ठरवलेला अभ्यास केल्यानंतर स्वतःसाठी प्रोत्साहन म्हणून थोडा वेळ काढा. आपला छंद, मित्रासोबत एक कप चहा किंवा आवडता कार्यक्रम यासाठी ठराविक वेळ काढून ठेवा. या ब्रेक मुले तुम्ही लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रेरित व्हाल. अधूनमधून मिळणारी बक्षिसे व प्रोत्साहने अभ्यास सत्रांना आनंददायक बनवतात.
स्त्रोत:
बेन मीर यांचे Twitter handle @SystemSunday
Nice
LikeLike
Very nice
LikeLike
Like
LikeLike
Very nice
LikeLiked by 1 person