‘इकीगाई’ म्हणजे असण्याचे कारण,जीवनाचा उद्देश. हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलेस यांनी ‘इकीगाई’ या जगद्विख्यात पुस्तकाद्वारे जपान मधील इकीगाई हे तत्त्वज्ञान जगासमोर आणले. स्वतःच्या जीवनाचा उद्देश शोधणे आणि त्याला साध्य करण्यासाठी पूर्ण समर्पणाने प्रयत्न करून एक आनंदी व समाधानी आयुष्य कसे जगावे याचा परिपाठ या पुस्तकात लेखकांनी आखून दिला आहे. एक अर्थपूर्ण, सुदृढ, सक्रीय आयुष्य व्यतीत करून आनंदी व दीर्घायुषी होण्याचे गमक इकीगाई तत्त्वज्ञानात सांगितलेले आहे.संपूर्ण वेळ, उर्जा व एकाग्रता समर्पित करून आपल्या ध्येयप्राप्तीसाठी उत्कटपणे प्रयत्न करणे आणि सोबतच इतरांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव टाकणे याबाबत या पुस्तकात विवेचन केले आहे.
[ English article: https://abhijitraut10.wordpress.com/2023/11/05/ikigai/ ]

Pic: Twitter @librarymindset
आपली ‘इकीगाई’ शोधण्यासाठी Four Square पद्धत वापरली जाते. एक मोठा चौरस काढा. त्याचे चार समान भाग करा.
# पहिल्या चौकोनात तुम्हाला काय करायला आवडते ते लिहा. हे तुम्हाला आनंद देईल असे आणि जे तुम्ही स्वेच्छेने कधीही कराल, असे काहीही असू शकते.
# दुसऱ्या चौकोनात तुम्ही कशात कुशल आहात ते लिहा. एखादी बाब ज्यामध्ये तुम्ही नैसर्गिकरित्या उत्कृष्ट आहात किंवा असे कौशल्य ज्यामध्ये तुम्ही परिपूर्ण होण्यासाठी वर्षे घालवली आहेत, याचा समावेश या चौकोनात होईल.
# तिसऱ्या चौकोनामध्ये तुम्ही कशाद्वारे अर्थार्जन करू शकता ते लिहा. तुम्ही जे करता ते तुम्हाला आवडते किंवा तुम्ही त्यात कुशल आहात हे पुरेसे नाही. जीवनाच्या गरजांची काळजी घेण्यासाठी आवश्यक पैसा कमावणे हे देखील महत्त्वाचे आहे.
# चौथ्या चौकोनात जगाला काय हवे आहे ते लिहा. आपण जे करतो ते या जगाला अधिक चांगले कसे बनवू शकते, हा विचार करणे आवश्यक आहे. याद्वारे आपण करत असलेल्या कामास अर्थ प्राप्त होतो.
या चार चौरसांचे विश्लेषण करा आणि सर्व चार चौकोनांमध्ये सामाईक असलेली क्रिया शोधण्याचा प्रयत्न करा. ही क्रिया तुमची इकिगाई किंवा जीवनाचा उद्देश आहे.

Pic: http://www.kanbanzone.com
ठळक मुद्दे:
[स्त्रोत:पुस्तकाचा उपसंहार]
1. सक्रिय रहा; निवृत्त होऊ नका.
जे लोक त्यांना आवडत असलेल्या गोष्टी करणे सोडतात ते जीवनातील त्यांचे ध्येय गमावतात. म्हणूनच तुमची अधिकृत व्यावसायिक क्रियाकलाप संपल्यानंतरही मूल्यनिर्मिती करणाऱ्या गोष्टी करत राहणे, विविध क्षेत्रात प्रगती करणे, इतरांसाठी उपयुक्त ठरणे, शक्य तेव्हा सर्वाना मदत करणे आणि आपल्या सभोवतालच्या जगाला अधिक चांगले बनवण्यासाठी योगदान देणे खूप महत्वाचे आहे.
2. घाई करू नका.
घाईत राहणे हे जीवनाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम टाकते. “हळूहळू चालणारा खूप दूरपर्यंत जातो” या अर्थाची एक जुनी म्हण आहे. जेव्हा आपण घाई सोडतो तेव्हा आयुष्य आणि वेळ नवीन अर्थ घेतात.
3. पोट भर खाऊ नका.
दीर्घायुष्यासाठी आवश्यक तेवढेच खाणे देखील महत्त्वाचे आहे. जपानी विचारसरणीनुसार अधिक काळ निरोगी राहण्यासाठी आपण पोट भरण्याऐवजी आपल्या भुकेपेक्षा थोडे कमी खावे.
4. चांगल्या मित्रांसोबत वेळ घालवा.
मित्र हे सर्वोत्तम औषध आहेत. मित्रांसोबत चांगल्या गप्पांमधून संवाद साधणे, तुमचा दिवस चांगला करणाऱ्या बाबींवर बोलणे, सल्ला घेणे, प्रसंगी मनोरंजन करणे, स्वप्ने पाहणे म्हणजेच ‘जगणे’ होय.
5. तुमच्या पुढील वाढदिवसापूर्वी सुदृढ,सुबक बना.
पाणी सुद्धा एका ठिकाणी साचून राहून निरुपयोगी बनते. तुम्ही आयुष्यभर ज्या शरीरात वास्तव्य करता ते दीर्घकाळ सुदृढ ठेवण्यासाठी दैनंदिन देखरेखीची गरज असते. शिवाय, व्यायामामुळे आनंद देणारे हार्मोन्स निर्माण होतात.
6. हसा.
आनंदी वृत्ती आपल्याला चांगल्या मनोवस्थेत ठेवते आणि मित्र बनवण्यास देखील मदत करते. लहान आणि साधारण गोष्टी सुद्धा आनंद देतात. अशा अनेक शक्यतांनी भरलेल्या जगात जीवित असणे हा एक विशेषाधिकार आहे हे आपण कधीही विसरू नये.
7. निसर्गाशी पुन्हा स्वतःला जोडा.
आजकाल बहुतेक लोक शहरांमध्ये राहतात. त्यामुळे निसर्गाशी संबंध जोडणे जास्त महत्त्वाचे बनले आहे. मानव नैसर्गिक जगाचा भाग आहे. आपली बॅटरी रिचार्ज करण्यासाठी आपण निसर्गाकडे वारंवार परतले पाहिजे.
8. आभार माना.
तुमच्या पूर्वजांचे, निसर्गाचे, तुमच्या मित्रांचे आणि कुटुंबियांचे आभारी राहा. तुमचे आयुष्य उजळवणाऱ्या आणि तुम्हाला जिवंत राहण्यासाठी मदत करणाऱ्या अशा प्रत्येक गोष्टीसाठी मनात कृतज्ञता बाळगा. आपल्या आयुष्याचे धन्यवाद देण्यासाठी दररोज एक क्षण घालवा आणि तुमचा आनंद वाढवा.
9. वर्तमानात जगा.
भूतकाळाबद्दल पश्चात्ताप करणे आणि भविष्याची भीती बाळगणे थांबवा. आज तुमच्याकडे सर्व काही आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ते संस्मरणीय बनवा.
10. तुमच्या इकीगाई चे अनुसरण करा.
तुमच्या आत एक उत्कटता आहे, एक अनोखी प्रतिभा आहे जी तुमच्या श्वासांना अर्थ देते आणि शेवटपर्यंत तुम्हाला तुमच्यातील सर्वोत्तम अभिव्यक्त करण्यास प्रवृत्त करते. व्हिक्टर फ्रँकलने म्हटल्याप्रमाणे तुमची इकिगाई काय आहे हे तुम्हाला अद्याप माहित नसल्यास, ते शोधणे हेच तुमचे ध्येय आहे.
अतिरिक्त मुद्दे:
1. इकिगाई हा जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे – असण्याचे कारण, जिवंत राहण्याचे कारण. जीवनाचा उद्देश. तुमचे जगात येण्याचे कारण.
2. दीर्घायुषी आणि आनंदी असण्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे उद्देश असणे. ज्याला जगायचे ‘का’ माहित आहे ती व्यक्ती ‘कसे’ याचे उत्तर शोधू शकते.
3. ज्ञानी व्यक्तीने जीवनातील सुखाकडे दुर्लक्ष करू नये. एक शहाणा माणूस या सुखांसह जगू शकतो परंतु सहजपणे आपण त्यांचे गुलाम बनू शकतो, याची जाणीव नेहमी ठेवली पाहिजे.
4. जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल, तर जगातील सर्वात वृद्ध व्यक्तींच्या सल्ल्याचे पालन करा. वडिलधाऱ्यांना त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवात कसे जगायचे याचे गमक समजले असते.
5. आपण तेच आहोत जे आपण वारंवार करतो. उत्कृष्टता ही एक कृती नसून एक सवय आहे.
6. तुम्ही कोणतेही काम करत असलात तरी लक्ष केंद्रित केल्याने तुमच्या कामात प्रवाहीपणा येतो ज्यामुळे तुम्ही ते काम लवकर आणि न थकता करू शकता. कठोर परिश्रम निवडा आणि स्पष्ट उद्दिष्ट ठेवा.
7. तणाव आणि नैराश्य हे दीर्घायुष्याचे शत्रू आहेत. त्यामुळे आनंदी जीवन जगण्यासाठी तणाव नेहमी टाळला पाहिजे.
8. जपानी कारागीरी, अभियांत्रिकी, झेन तत्त्वज्ञान आणि पाककृतीमध्ये एक साम्य आहे: साधेपणा आणि तपशीलाकडे लक्ष.
9. ध्यान करण्यास सुरुवात करणार्या लोकांमधील सर्वात सामान्य चूक म्हणजे ते ‘योग्य’ करण्याबद्दल आणि पूर्ण मानसिक शांतता प्राप्त करणे किंवा ‘निर्वाण’ गाठणे याबद्दल काळजी करणे. ध्यानधारणेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवासावर लक्ष केंद्रित करणे.
10. दीर्घायुष्याचे रहस्य आहे- काळजी करू नका. चांगल्या सवयी जोपासा. तुमची मैत्री जोपासा. एक अपूर्ण परंतु शांत जीवन जगा. आशावादी राहा.
वाचण्यासारखे:
Atomic Habits पुस्तकाचा मराठी सारांश
Deep Work पुस्तकाचा मराठी सारांश
संदर्भ:
Twitter @librarymindset
http://www.readersbooksclub.com
It’s a very good book sir.. Just had opportunity to read it recently.
-Sumit
LikeLiked by 1 person
Excellently summerised! 👍👌
LikeLiked by 1 person
Beautiful and very important thoughts from the book… definitely need to read…
LikeLiked by 1 person
It’s very helpful
LikeLiked by 1 person
So nice & most important thoughts for our life ….definitely need to read ….
LikeLiked by 1 person
अत्यंत उपयोगी माहिती
LikeLiked by 1 person